Swami samarth quotes in marathi | स्वामी समर्थांचे विचार
नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचा Caption_trend वेबसाइट वर या पोस्ट मध्ये तुम्हाला Swami samarth quotes in marathi ,स्वामी समर्थांचे विचार वाचायला भेटल.माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी असतात.स्वामीच्या विचाराच आचरण केल्यास आयुष्य सुखी व समाधानी होता व आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते.
Swami samarth quotes in marathi | स्वामी समर्थांचे विचार
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्या शिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकझाल्या वर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील.
“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”
“गरिबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधी वाया जात नाही.”


श्री स्वामी समर्थांची आरती
स्वामी समर्थांची आरती सदा भक्तांना प्रेरणा आणि ऊर्जा देते
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
जयदेव जयदेव..!!
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
जयदेव जयदेव..!!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
जयदेव जयदेव..!!
देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया !!
जयदेव जयदेव..!!
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
जयदेव जयदेव..!!
श्री स्वामी समर्थांची फोटो
“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”


श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
स्वामी माऊलींचा आधार असला की,आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो.
निःशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना…!
प्रचंड स्वामीबळ पाठीशी……. !
नित्य आहे रे मना,
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी…..!
अशक्य ही शक्य करतील स्वामी….


मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे.मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे.
गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे.मी कुठेही गेलेलो नाही.
मी सदैव तुझ्या पाठिशी आहे
जर तुम्हाला स्वामींची गाणी ऐकायला आवडत तर असतील पुढील लिंक वर क्लिक करा👉 स्वामी समर्थ गाणी🙏
आम्ही आशा करतो की तुम्हाला Swami samarth quotes in marathi | स्वामी समर्थांचे विचार आवडला असेल तर आपल्या जवळच्या स्वामी भक्ता बर share करा, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.